इमोशनमीटर

या स्टेशनवर तुम्ही " राग" या भावनेचा "इमोशनमीटर" बनवायचा आहेत (कारमध्ये स्पीडोमीटर असतो तसा). त्या मध्ये राग या भावनेच्या 'अतिशय नगण्य" ते "अतीव राग" यामधील ९ टप्पे दाखवायचे आहेत. त्या नंतर असाच इमोशनमीटर, आपण आपल्याला पाहिजे असलेल्या इतर कोणत्याही भावनांबद्दल बनवू शकता.

उद्दिष्ट

भावना आणि अनुभूती यांची माहिती मिळविणे आणि त्या बद्दल चा शब्दसंग्रह वाढवणे.

माल

सूचना

  1. ते ४ असे रंग निवडा की जे “राग” ही  भावना व्यक्त करू शकतील. (या साठी handout  चा वरचा अर्धा भाग वापरा).
  2. इमोशनमीटर वर “राग” या भावनेच्या सुरवाती  पासून ते शेवट पर्यंतच्या (“शांत भाव” ते “अतीव क्रोध”) अवस्था ९ चौकटींमध्ये लिहिल्या आहेत.  त्यात ४ चौकटी रिकाम्या आहेत. त्या चार अवस्था तुम्हाला ओळखायचा आहेत आणि मोकळ्या चौकटीत क्रमाने लिहायच्या आहेत. जितका चपखल (बरोबर) शब्द सुचेल तो लिहा.  
  3. या प्रत्येक अवस्था दर्शविण्या साठी तुम्हाला योग्य वाटेल त्यारंगांचा वापर करा.

त्या नंतर आनंद, दु: ख, स्वीकृती, विश्वास, अपेक्षा … किंवा आपल्याला आवडणार्या कोणत्याही भावना घेऊन असाच इमोशनमीटर तया करा 

चर्चा

  • हे झाल्या नंतर तुम्ही कोणीही अशी व्यक्ती शोधा की ज्याने  तुम्ही विचार केलेल्या भावनेचा इमोशनमीटर तयार केला आहे. 
  • आता बघा कि तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या इमोशनमीटर च्या अवस्थांमध्ये किती अवस्था सामान आहेत किंवा असमान आहेत?
  • शब्दांचा विचार करणे किंवा चित्र काढणे हे वाटले तितके सोपे होते का? तुमचा अनुभव काय आहे?
  • असा विचार करा की  भविष्यात एखादेवेळी आपल्याला त्याच भावनेची जाणीव झाली आणि समाज तुमचा इमोशनमीटर तेंव्हा तुमच्या आठवणीत आहे , अशा वेळेला ती भावना आणि अवस्था व्यक्त करायला जर का तुम्हाला एक अचूक शब्द आठवला तर तुम्हाला कसे वाटेल?
  • आपण पूर्ण केल्यावर, आपल्या इमोशनमीटर भिंतीवर चिकटवा. आपल्याला आवडत असल्यास, एक फोटो घ्या.

निर्माता

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

About this activity…

 म्हातारपण:

SDG:

गट आकार:

ईक्यू क्षेत्र:

वेळ:

4-10 मिनिटे

प्रदर्शन व्हिडिओ: